
ॲप गोपनीयता विभागामध्ये, ॲपच्या सामान्य वापरा दरम्यान डेव्हलपर किंवा त्यांच्या थर्ड‑पार्टी भागीदारांकडून कोणत्या प्रकारचा डेटा संकलित केला जाऊ शकतो, ह्याविषयीची माहिती समाविष्ट असते; परंतु, ह्यामध्ये डेव्हलपरच्या सर्व कार्यपद्धतींचे वर्णन केलेले असेलच असे नाही. तुमच्याकडून संकलित केला जाणारा डेटा, ह्या विभागामध्ये दर्शविलेल्या माहितीपेक्षा वेगळा देखील असू शकतो. उदाहरणार्थ, संकलित केला जाणारा डेटा हा तुम्ही वापरत असलेल्या फीचर्सवर जसे की तुम्ही केवळ ॲपचे सशुल्क व्हर्जन वापरत आहात की नाही किंवा तुम्ही अल्पवयीन आहात की नाही ह्या बाबींवर अवलंबून असू शकतो.
ह्याव्यतिरिक्त, संकलित केलेला डेटा खालील सर्व निकष पूर्ण करत असल्यास, डेव्हलपर्सना ह्या विभागामध्ये त्या डेटाची नोंद करणे आवश्यक नसते :
• तुम्ही ॲपच्या यूझर इंटरफेसमध्ये थेट ॲपला डेटा प्रदान करता.
• तुम्ही सबमिट केलेल्या डेटाच्या बाजूला तुमचे नाव किंवा अकाउंट नाव स्पष्टपणे दिसते.
• डेटा सबमिशन ऐच्छिक आहे, ह्याचा अर्थ ॲपला कार्य करण्यासाठी तुम्हाला डेटा प्रदान करण्याची आवश्यकता नसते.
• तुम्ही प्रत्येक वेळी डेटा संकलित केल्यावर ते प्रदान करण्याचे निश्चितपणे निवडता.
• डेटा संकलन केवळ ॲपच्या प्राथमिक कार्यक्षमतेचा भाग नसलेल्या दुर्मिळ प्रकरणांमध्ये होते.
• डेटा केवळ ॲप कार्यक्षमता, वैयक्तिकरण किंवा विश्लेषणासाठी वापरला जातो आणि ॲप्स किंवा संकेतस्थळांवर तुमचा मागोवा घेण्यासाठी किंवा तुम्हाला जाहिराती दाखवण्यासाठी नाही.
नियमन केलेल्या आर्थिक सेवा किंवा आरोग्य संशोधनाची सुविधा देणाऱ्या काही ॲप्ससाठी, खालील परिस्थितींमध्ये डेव्हलपर्स ॲप गोपनीयता विभागामध्ये डेटाची यादी न करणे निवडू शकतात :
नियंत्रित वित्तीय सेवांची सुविधा देणाऱ्या ॲपद्वारे डेटा गोळा केला जातो आणि :
• तुमच्याकडून नियंत्रित डेटाचे संकलन करणे हे ऐच्छिक आहे आणि ते केवळ अशा प्रकरणांमध्ये होते जे ॲपच्या प्राथमिक कार्यक्षमतेचा भाग नाहीत.
• तुमच्याकडून संकलित करण्यात आलेला डेटा, संबंधित वित्तीय सेवा किंवा डेटा संरक्षण कायदे किंवा नियमांअंतर्गत येणाऱ्या गोपनीयता नोटीसद्वारे संरक्षित आहे.
• गोपनीयता सूचना स्पष्ट करते की, इतर उत्पादने आणि सेवांची जाहिरात करण्यासाठी तुमचा डेटा कोणत्याही असंबंधित थर्ड पार्टींशी शेअर केला जात नाही.
• तुमचा डेटा जाहिरातींच्या उद्देशाने थर्ड पार्टी डेटाशी लिंक केला जात नाही किंवा डेटा ब्रोकरसोबत शेअर केला जात नाही, ह्याला अपवाद फक्त फसवणुकीच्या उद्देशांचा किंवा जेव्हा डेटा ब्रोकर ही ग्राहक अहवाल एजन्सी असेल आणि क्रेडिट रिपोर्टिंगच्या उद्देशाने डेटा शेअर केला जातो हे आहेत.
तुमच्याकडून संकलित केलेला डेटा हा एका माहितीपूर्ण सहमती पत्राच्या अधीन आहे, ज्याला तुम्ही एका आरोग्य संशोधन अभ्यासाचा भाग म्हणून सहमती दिली आहे, ज्याचे पुनरावलोकन संस्थात्मक पुनरावलोकन मंडळ किंवा नैतिक पुनरावलोकन मंडळाने केले आहे आणि त्याला मान्यता दिली आहे आणि हा डेटा ॲप्स किंवा संकेतस्थळांवर तुमचा ट्रॅक ठेवण्यासाठी वापरला जात नाही.
ह्या विभागात डिव्हाइसच्या ऑपरेटिंग सिस्टिमद्वारे संकलित केलेल्या डेटाची माहिती देखील वगळण्यात आली आहे, ज्याचा डेव्हलपर्सना ॲक्सेस नाही. अशा प्रसंगी संकलित केली जाणारी ही माहिती तुम्ही तुमचे Apple अकाउंट, तुमचे डिव्हाइस आणि इतर Apple सेवा सेट अप केल्यावर वेगळ्या प्रकटीकरणात तुमच्यासमोर सादर केली जाते.
डेव्हलपरद्वारे संकलित केलेल्या डेटा आणि तो कसा वापरला जातो ह्याविषयी अधिक माहितीसाठी, डेव्हलपरचे गोपनीयता धोरण पहा.