डुओलिंगो: भाषा शिकण्याचे धडे

इंग्रजी, स्पॅनिश, जर्मन शिका

विनामूल्य · इन-ॲप खरेदी

जगभरात सर्वाधिक डाऊनलोड केल्या जाणाऱ्या शैक्षणिक ॲपच्या मदतीने नवीन भाषा शिका! डुओलिंगो हे 40 हून अधिक भाषा शिकण्यासाठीचे एक मजेदार आणि मोफत ॲप आहे. यामध्ये छोट्या व सुटसुटीत धड्यांच्या साहाय्याने भाषा शिकता येते. तुमचा शब्दसंग्रह आणि व्याकरण कौशल्ये सुधारण्यासाठी बोलण्याचा, वाचण्याचा, ऐकण्याचा आणि लिहिण्याचा सराव करा. भाषातज्ज्ञांनी विकसित केलेल्या आणि जगभरातील कोट्यवधी अभ्यासकांच्या आवडत्या डुओलिंगोमुळे तुमची इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन, इटालियन, जपानी आणि इतर अनेक भाषांमध्ये प्रत्यक्ष संभाषणाची तयारी व्हायला मदत होते. प्रवास, शिक्षण, करिअर, कुटुंब आणि मित्र-परिवार किंवा मेंदूचं आरोग्य यांपैकी कोणत्याही कारणास्तव तुम्ही एखादी भाषा शिकत असाल, तरीही तुम्हाला डुओलिंगोसोबत शिकायला नक्कीच आवडेल. डुओलिंगो का निवडावे? • डुओलिंगो मजेदार आणि प्रभावी आहे. एखाद्या गेमसारखे धडे आणि गंमतीदार पात्रे यांच्या मदतीने तुम्ही बोलणे, वाचणे, ऐकणे आणि लिहिणे यांची उत्तम कौशल्ये विकसित करू शकता. • डुओलिंगो अत्यंत उपयुक्त आहे. डुओलिंगोची शिकवण्याची पद्धत भाषातज्ज्ञांनी विकसित केलेली असून वैज्ञानिक आहे. त्यामुळे दीर्घकाळ भाषा लक्षात ठेवायला ती उपयोगी पडते. • तुमच्या प्रगतीवर लक्ष ठेवा. रोजच्या सरावाची सवय लावून मजेदार बक्षिसे मिळवा आणि तुमची भाषा शिकण्याची ध्येये गाठण्याकडे वाटचाल करत राहा. • 30 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांमध्ये सामील व्हा. आमच्या जगभरातील समुदायासोबत शिकताना स्पर्धात्मक लीडरबोर्ड्सद्वारे प्रोत्साहन मिळवत राहा. • प्रत्येक भाषेचा कोर्स मोफत आहे. स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन, इटालियन, रशियन, पोर्तुगीज, तुर्की, डच, आयरिश, डॅनिश, स्वीडिश, युक्रेनियन, एस्पेरांतो, पोलिश, ग्रीक, हंगेरियन, नॉर्वेजियन, हिब्रू, वेल्श, अरबी, लॅटिन, हवाईयन, स्कॉटिश गॅलिक, व्हिएतनामी, कोरियन, जपानी, इंग्रजी आणि अगदी हाय व्हॅलेरियनसुद्धा शिका! डुओलिंगोबद्दल जग काय म्हणते: "भाषा शिकण्यासाठीचे आत्तापर्यंतचे सर्वोत्तम ॲप." — The Wall Street Journal “मी वापरून पाहिलेल्या भाषा शिकण्याच्या सर्वात प्रभावी पद्धतींपैकी हे मोफत ॲप आणि वेबसाइट आहे.… यात बोलणे, भाषांतर करणे आणि बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे देणे यांसारख्या छोट्या आव्हानांच्या स्वरूपात धडे असतात. त्यामुळे मला ते पुनःपुन्हा वापरावेसे वाटते." — The New York Times "शिक्षणाचे भविष्य घडवणारे रहस्य कदाचित डुओलिंगोकडे असू शकते." — TIME Magazine “...डुओलिंगो आनंदी, खेळकर आणि मजेदार आहे…” — Forbes “भाषा शिकण्यासाठीचे आमचे आवडते ॲप…” — CNET तुम्हाला डुओलिंगो आवडले असल्यास सुपर डुओलिंगो 14 दिवस मोफत वापरून पहा! जाहिरातींशिवाय वेगाने भाषा शिका आणि अमर्याद हार्ट्स व मंथली स्ट्रीक रिपेअरसारखे मजेदार फायदे मिळवा. तुम्ही सुपर डुओलिंगो खरेदी करण्याचा पर्याय निवडल्यास तुमच्या Apple खात्यावरून पेमेंट आकारले जाईल आणि सध्याचा कालावधी संपण्याच्या 24 तासांच्या आत तुमच्या खात्यावर नूतनीकरणाचे शुल्क आकारले जाईल. खरेदीनंतर App Store मधील सेटिंग्जमध्ये जाऊन 'ऑटो-रिन्यूअल' कधीही बंद करता येते. मोफत ट्रायलचा काही कालावधी न वापरता शिल्लक राहिल्यास, जेथे हा नियम लागू असेल तेथे युजरने त्या सेवेचे सबस्क्रिप्शन खरेदी केल्यावर तेवढा कालावधी रद्द होईल. गोपनीयता धोरण: https://www.duolingo.com/privacy सेवा अटी: https://www.duolingo.com/terms

  • ४.७
    5 पैकी
    २.१ लाख मानांकन

हुर्रेss! आनंदाची बातमी! डुओलिंगो आता मराठी भाषिकांसाठी उपलब्ध आहे!

डेव्हलपर Duolingo ने सूचित केले आहे की ॲपच्या गोपनीयता सरावामध्ये खाली वर्णन केल्याप्रमाणे डेटा हाताळणे समाविष्ट असू शकते. अधिक माहितीसाठी, डेव्हलपरचे गोपनीयता धोरण पाहा.

  • तुमचा मागोवा घेण्यासाठी वापरलेला डेटा

    खालील डेटा इतर कंपन्यांच्या मालकीच्या ॲप आणि वेबसाइटवर तुमचा मागोवा घेण्यासाठी वापरला जाऊ शकतो :

    • खरेदी
    • स्थान
    • संपर्क माहिती
    • यूझर कॉण्टेण्ट
    • आयडेंटिफायर्स
    • वापरण्यात आलेला डेटा
    • डायग्नॉस्टिक्स
    • इतर डेटा
  • तुमच्याशी लिंक असलेला डेटा

    खालील डेटा संकलित करून आणि तुमच्या आयडेंटिटीशी लिंक केला जाऊ शकतो :

    • खरेदी
    • आर्थिक माहिती
    • स्थान
    • संपर्क माहिती
    • संपर्क
    • यूझर कॉण्टेण्ट
    • सर्च हिस्ट्री
    • आयडेंटिफायर्स
    • वापरण्यात आलेला डेटा
    • डायग्नॉस्टिक्स
    • इतर डेटा

तुमच्याद्वारे वापरले जाणारे फीचर्स किंवा तुमचे वय ह्यांच्या आधारावर गोपनीयता पद्धती भिन्न असू शकतात. अधिक जाणून घ्या

डेव्हलपरने हे ॲप कोणत्या ॲक्सेसिबिलिटी फीचर्सला सपोर्ट करते हे अद्याप सूचित केलेले नाही. अधिक जाणून घ्या

प्रदाता
  • Duolingo, Inc
आकार
  • ५१३.३ MB
श्रेणी
  • शिक्षण
सुसंगतता
iOS 17.0 किंवा नंतरचे व्हर्जन आवश्यक आहे.
  • iPhone
    iOS 17.0 किंवा नंतरचे व्हर्जन आवश्यक आहे.
  • iPad
    iPadOS 17.0 किंवा नंतरचे व्हर्जन आवश्यक आहे.
  • Apple Vision
    visionOS 1.0 किंवा नंतरचे व्हर्जन आवश्यक आहे.
भाषा
मराठी आणि ३२ अधिक
  • मराठी,Bengali,Hindi,Simplified Chinese,Traditional Chinese,Urdu,Vietnamese,अरबी,इंग्रजी,इंडोनेशियन,इटालियन,कन्नड,कोरियन,ग्रीक,जपानी,जर्मन,झेक,डच,तमिळ,तुर्की,तेलुगु,थाई,पंजाबी,पोर्तुगीज,पोलिश,फिलीपीनो,फ्रेंच,युक्रेनियन,रशियन,रोमानियन,स्पॅनिश,स्वीडिश,हंगेरियन
वय रेटिंग
4+
ॲपमधील खरेदी
होय
  • Super Duolingo ₹ 1,749
  • Super Duolingo ₹ 1,379
  • Super Duolingo ₹ 1,199
  • Super Duolingo ₹ 1,749
  • Super Duolingo ₹ 215
  • Super Duolingo ₹ 1,379
  • Super Duolingo ₹ 1,199
  • Super Duolingo ₹ 199
  • Super Duolingo ₹ 199
  • Super Duolingo ₹ 1,199
कॉपीराइट
  • © 2026 Duolingo, Inc.